आठवडाभरात 30 सापांची सुटका

672

मुंबई उपनगरांमध्ये विविध जातींच्या 30 सापांची सुटका प्लॅण्ट ऍण्ड ऑनिमल वेल्फेअर सोसायटी आणि अम्मा केअर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केली. मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, घाटकोपर, पवई, साकीनाका, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, राम मंदिर रोड या भागांमध्ये मानवी वस्त्यांमध्ये हे साप शिरले होते. त्यात नाग, घोणस, मण्यार, मांजऱया, हरणटोळ, चापडा, धामण, पाणदिवड, कवडय़ा, तस्कर या जातीच्या सापांचा समावेश होता, अशी माहिती मुंबईचे मानद वन्यजीव रक्षक सुनीष सुब्रमण्यम यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या