शिवभोजन थाळीला बाप्पाचेही आशीर्वाद, श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचा 5 कोटींचा निधीचा प्रस्ताव

3412

गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. शिवभोजन थाळीला वाढता प्रतिसाद पाहता याची संख्याही 18 हजारांवरून 36 हजार करण्यात आली. आता शिवभोजन थाळीला बाप्पाचेही आशीर्वाद मिळाले आहेत. मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने शिवभोजन थाळीसाठी 5 कोटींचा निधीचा प्रस्ताव दिल्याची माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या