अमोल कीर्तिकर अध्यक्षपदी , मुंबई उपनगर बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिटनेस असोसिएशन निवडणूक

शिवसेना युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची मुंबई उपनगर बॉडी बिल्डिंग अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी पुन्हा एकदा सुनील शेगडे यांचीच नियुक्ती झाली. तसेच संतोष पवार यांची खजिनदारपदी वर्णी लागली. सेंट्रल रेल्वे, सांस्कृतिक अकादमी, लोअर परेल येथे निवडणूक पार पडली.

चेतन पाठारे व अॅड. विक्रम रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. याप्रसंगी मधुकर तळवलकर, हेमचंद्र पाटील यांच्यासह संलग्न व्यायामशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे या संघटनेचे प्रमुख आश्रयदाते आहेत. तसेच आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर व रमेश लटके हे या संघटनेचे आश्रयदाते आहेत.

नवी कार्यकारिणी खालीलप्रमाणे

अध्यक्ष – अमोल कीर्तिकर
सरचिटणीस – सुनील शेगडे
कार्यकारी उपाध्यक्ष – पराग अळवणी
कार्यकारी उपाध्यक्ष – प्रवीण पाटकर
उपाध्यक्ष – शंकर कांबळी
उपाध्यक्ष – किटी फॉन्सेस्का
उपाध्यक्ष – प्रशांत कदम
उपाध्यक्ष – महेश पारकर
उपाध्यक्ष – सचिन पाटील
खजिनदार – संतोष पवार
सहसचिव – राम नलावडे
सदस्य – अॅड. विक्रम रोठे
सदस्य – आनंद गोसावी
सदस्य – अशोक शेलार
सदस्य – विशाल परब
सदस्य – गिरीश कोटीयन
सदस्य – संतोष तावडे
सदस्य – अब्दुल मुकादम
सदस्य – हिरल शहा

आपली प्रतिक्रिया द्या