वीजवाहिनीच्या ठिणग्या पडून वडाळ्यात सहा जण जखमी

175

टाटा पॉवर कंपनीच्या उच्चदाब वाहिनीच्या ठिणग्या पडून सहा जण जखमी झाल्याची घटना आज वडाळ्यात घडली. या दुर्घटनेत दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जखमींना केईएम क शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत एका मांजरीचा मृत्यू झाला.

वडाळा पूर्वेकडील सॉल्ट पॅन लेकजवळील गणेश नगर येथे दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. टाटा कंपनीच्या उच्च दाब विद्युतवाहिनीमध्ये स्पार्क होऊन त्याच्या ठिणग्या खोली क्रमांक 353 मधील विद्युत केबलवर पडल्या. त्यामुळे तेथे आगीच्या ज्वाला निर्माण झाल्या. या दुर्घटनेत एकूण सहा जण जखमी झाले. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. यामध्ये जखमी झालेल्या जागृती चिकाटे (36), स्वरा चिकाटे (2 कर्ष) क अंश खारगाककर – (दीड कर्ष) यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या दिप्ती अलंकार खारगावकर (5 कर्ष), खुशी पांडुरंग चिकले (3 कर्ष), जयश्री अलंकार खारगावकर ( 40) यांच्याकर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या