Live :- कोकण-ठाण्यासह मुंबईला पावसाचा तडाखा; नद्यांना पूर, कसाऱ्यात दरड कोसळली

konkan-flood

कोकण, ठाणे, मुंबई परिसरासाठी गुरुवारी हवामान विभागाने आधीच रेड अॅलर्ट दिला होता. त्याचाचा प्रत्यय आज पाहायला मिळत आहे. कोकण किनारपट्टीला पावसानं अक्षरश: झो़डपून काढलं आहे. रत्नागिरी, रायगडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे, मुंबई जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. पावसाचे ताजे अपडेट आम्ही येथे देत आहोत.

 • रत्नागिरी – सर्वच नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

  रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.खेडमध्ये जगबुडी,चिपळूणात वशिष्टी नदी,संगमेश्वरमध्ये शास्त्री नदी,सोनवी नदी,बावनदी,लांजामध्ये मुचकुंदी नदी,काजळी नदी,राजापूरात कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडल्याने रत्नागिरी जिल्ह्यात महापूर आला आहे.

 • कोकण रेल्वेची वाहतूक थांबवली, अतिवृष्टी-पूरपरिस्थितीमुळे घेतला निर्णय
 • खेड,चिपळूण,रत्नागिरीत पूर
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नारिंगी,जगबुडी,वशिष्टी आणि काजळी नद्याना पूर आला आहे.पुरामुळे हाहाःकार उडाला असून जनजीवन ठप्प झाले आहे.पुराचे पाणी बाजारपेठा आणि लोकवस्तीत घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वशिष्टी नदीला पूर आल्याने चिपळूण बाजारपेठ आणि चिपळूण शहर जलमय झाले आहे.रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पाणी भरले असून बाजारपेठ जलमय झाली आहे.जगबुडी नदीला पूर आल्याने खेड शहरात पाणी भरले आहे.

राज्यभरातील पावसाचे Live Updates:

 • कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा
 • रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई परिसरातील अनेक भागात पावसाची संततधार
 • ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील अनेक भागात पाणी साचले
 • गुरांच्या गोठ्यात पाणी साचल्याने गुरांचेही हाल
 • रायगड जिल्ह्यातील पोलादपूरात रानबाजिरे धरणाने धोक्याची पातळी ओलांडली
 • पोलादपूर शहरात जुना महाबळेश्वर रस्ता पाण्याखाली
 • पोलादपूर सिद्धेश्वर आळी मध्ये घरात काल रात्री 2 फूटापर्यंत पाणी भरले होते, पावसाचा जोर ओसरल्यावर पाणी कमी झाले
 • आपटा ,पाताळगंगा पाणी पातळी वाढली
 • सावरोली पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
 • पाली वाकण मार्गावरील वाहतूक बंद
 • कर्जत – खोपोली रेल्वे सेवा बंद
 • नागोठणे येथे पूरस्थिती
 • कुंडलिका, आंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास नदीच्या पातळीत वाढ
 • महाड शहरात पूरस्थिती
 • नेरळ – कळंब रस्त्यावर पाणी
 • टिटवाळा – कसारा वाहतूक बंद
 • कसारा घाटात दरड कोसळली
 • उंबरमाळी येथे ट्रॅकच्या पुलाखालील भराव वाहून गेला
 • शहापूरकरांनी पुराच्या भीतीने रात्र जागून काढली..
 • बदलापूर पुलावरून पाणी .. पुराचे पाणी बदलापूरात शिरले
 • भिवंडी पडघा रोड पाण्याखाली
 • कल्याणमध्ये पूर.. तबेल्यात म्हशी बुडाल्या

Mumbai Maharashtra Rains Live Updates:

आपली प्रतिक्रिया द्या