मुंबई, ठाणे, रायगड, नाशिकमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

1107

दिवाळी अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेली असतानाही अद्याप पावसाने काढता पाय घेतलेला नाही. शुक्रवारी सकाळी मुंबई व ठाण्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती.

गेल्या काही दिवसांपासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते. मुंबईकरांना ऑक्टोबर हिटचा चांगलाच अनुभव गेल्या दोन दिवसांत मिळाला आहे. त्यामुळे वैताग आणलेल्या पाऊसातून सुटका झालेले मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून कडकडीत उन्हामुळे हैराण झाले होते. अशातच शुक्रवार सकाळपासूनच मळभ असलेले वातावरण होते व त्यानंतर दुपारी मध्य मुंबईत पावसाने हजेरी लावली. पावसामुळे तापमानात काही अंशी घट झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने येत्या काही तासात मुंबई, ठाणे, नाशिक, जळगावमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. या भागात वीजेचा कडकडात व वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या