मुंबई विद्यापीठ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी रतन टाटा

482
रतन टाटा (टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष)

मुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. शैक्षणिक, उद्योग क्षेत्रातील जागतिक प्रवाहांचा सखोल अभ्यास असलेल्या उद्योगपतीची सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नामनिर्देशन करण्याची तरतूद विद्यापीठ अधिनियमामध्ये आहे.

अणुशास्त्र्ाज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि राज्य सरकारच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना या सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. अन्य दोन सदस्यांचे नामनिर्देशन लवकरच होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरू हे या परिषदेचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.

शिक्षण, संशोधन आणि विकास, प्रशासन यासंबंधीच्या कृतियोजना सादर करून त्याद्वारे कुलगुरूंना सल्ला देणे, विद्यापीठाला शैक्षणिकदृष्टय़ा सशक्त, प्रशासनिकदृष्टय़ा कार्यक्षम आणि आर्थिकदृष्टय़ा भक्कम करण्याचे काम सल्लागार परिषद करते. विद्यापीठाच्या विकासासाठी विशेष काम हाती घेण्याचे अधिकार परिषदेच्या अध्यक्षांना असतात. रतन टाटा यांच्या अनुभवाचा विद्यापीठाच्या विकासासाठी निश्चितच फायदा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या