सांगा परीक्षा कशी द्यायची… ऑनलाइन की ऑफलाइन? तुम्हीच ठरवा!

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यातील विद्यापीठ, कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत. या परीक्षा देणाऱया लाखो विद्यार्थ्यांसाठी शनिवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा विद्यार्थ्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. तर परीक्षा ऑनलाइन द्यायची की ऑफलाइन याचा निर्णय विद्यार्थ्यांना घेण्याची मुभा देण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी जाहीर केले.

इंजिनीअरिंगच्या परीक्षा ऑनलाइनच

राज्यातील इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकल विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 100 टक्के ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी जाहीर केले. त्यानुसार या परीक्षांचे नियोजन सुरू करण्यात आले असल्याचेदेखील त्यांनी यावेळी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या