आयडॉलच्या ऍडमिशनला मुदतवाढ,लेट फी भरून 25 सप्टेंबरपर्यंत घेता येणार प्रवेश

313

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब शुल्क भरून इच्छुक विद्यार्थी या दिनांकापर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रवेशाची तारीख वाढवली असल्याने ही मुदतवाढ दिली असल्याचे आयडॉलच्या संचालिका डॉ. कविता लघाटे यांनी सांगितले.

आयडॉलमध्ये आजपर्यंत 67 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून त्यातील 64 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहे. 42 हजार 905 विद्यार्थ्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत प्रवेश घेतला आहे. एम.कॉम. अभ्यासक्रमाला 24,428 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला तर बीए व एमए या अभ्यासक्रमात 18,963 विद्यार्थांनी प्रवेश घेतला. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत 1806 विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे. सदर प्रवेश हे ऑनलाईन असून प्रवेश शुल्क हेदेखील ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. हे प्रवेश http://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून करावयाचे आहेत.

आजपर्यंत झालेले प्रवेश

  • बीए- 12,843,
  • बीकॉम- 18,070,
  • एमए- 5,521,
  • एमकॉम- 24,428,
  • एमए-शिक्षणशास्त्र- 599,
  • पीजीडीएफएम व डीओआरएम- 407,
  • बीएस्सी आयटी- 423,
  • एमएस्सी आयटी- 607,
  • एमएस्सी गणित- 245,
  • एमसीए- 531
आपली प्रतिक्रिया द्या