वसईमध्ये सासूने केली सुनेची हत्या, कापलेला हात घेऊन पोलीस स्थानकात हजर

11026

वसईमध्ये एका महिलेने आपल्या एनआरआय सुनेची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर हत्येनंतर आरोपी महिला कापलेला हात घेऊन थेट पोलीस स्थानकात हजर झाली. महिलेने हत्येचा गुन्हा कबूल केला असून आत्मसमर्पण केले आहे. रविवारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत राहणाऱ्या आनंदी माने या महिलेने आपली सून रिया उर्फ स्वाती माने हिची झोपेत असतानाच जड वस्तू डोक्यात घालून हत्या केली. हत्येनंतर आरोपी महिलेने चाकूच्या सहाय्याने मृतदेहापासून हात वेगळा केला. यानंतर झोपेच्या गोळ्या खाऊन पोलीस स्थानकात हजर झाली आणि गुन्ह्याची कबुली दिली. या दरम्यान महिलेची तब्येत बिघडल्याने दिला पोलिसांना रुग्णालयात दाखल केले.

आरोपी महिलेचा मुलगा रोहन आणि मृत रिया यांचा पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर रियाला टेक्सासमध्ये नर्सचा जॉब मिळाला. त्यामुळे पत्नीसोबत रोहनही अमेरिकेला गेला. डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये रिया पतीसह सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून हिंदुस्थानमध्ये आली होती. स्वाती नर्सिंगचे काम करत होती आणि तिच्या सासूला सुनेचे हे काम आवडत नव्हते. सासू सातत्याने तिच्यावर जॉब बदलण्यासाठी दबाव टाकत होती.

…म्हणून केली हत्या
पोलीस तपासादरम्यान आरोपी महिला आनंदीने सांगितले की, रिया नातीसोबत मला वेळ घालवू देत नव्हती. शनिवारी आनंदी नातीसोबत मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी तयार झाली, मात्र रियाने नकार दिला. या क्षुल्लक गोष्टीवरून नाराज झालेल्या आनंदी यांनी सून रिया हिची हत्या केली. ‘दै. भास्कर‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या