वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदेंचा मारेकरी अहमद कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा

997

मुंबईच्या सत्र न्यायालयाने अहमद कुरेशी नावाच्या आरोपीला वाहतूक पोलीस दलाचे हवालदार विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी दोषी ठरवले होते. कुरेशीला शनिवारी मुंबईच्या सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याव्यतिरिक्त त्याला 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे. ऑगस्ट 2016 साली विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन बाईकस्वाराला अडवलं होतं. हेल्मेट नसल्याने शिंदे यांनी त्याला रोखलं होतं. या मुलाचं आणि शिंदे यांचं भांडण झालं होतं. हा मुलगा रागारागाने तिथून निघून गेला आणि त्याने त्याच्या भावाला बोलावलं होतं. त्याचा भाऊ म्हणजेच अहमद कुरेशी हा बांबू घेऊन आला आणि त्याने भावाच्या मदतीने शिंदे यांना बेदम मारहाण केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या