मुंबईचे पाणी शुद्ध! दिल्लीतील पाण्याचा दर्जा तळाला

1300

मुंबईकर पीत असणारे पाणी संपूर्ण देशात सर्वात शुद्ध असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये दिल्लीतील पाण्याचा दर्जा सर्वात कमी आहे. ‘द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’कडून देशातील निवडक मोठय़ा शहरांतील पाण्याचे नमुने घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले.

पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. केवळ अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्यामुळे अनेकजण वॉटर प्युरिफायरचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत ‘द ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डकडून काही मोठय़ा शहरांतील पिण्याच्या पाण्याचा दर्जा तपासण्यात आला. यामध्ये मुंबईकरांना मिळणारे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले. तर मुंबईनंतर हैदराबाद, भुवनेश्वर, रांची, रायपूर, अमरावती यांचा नंबर लागत असून दिल्लीतील पाण्याचा दर्जा 21 व्या क्रमांकावर आहे.

फिल्टरेशन, क्लोरिन ट्रीटमेंट, तपासणी

आपली प्रतिक्रिया द्या