धक्कादायक…पत्नीचा घरी येण्यास नकार; नवऱ्याने केली सासरा आणि सालीची हत्या…

पती-पत्नीतील भांडणामुळे रागावून पत्नी माहेरी निघून जाते. राग कमी झाल्यावर माहेरी परत येते किंवा नवरा तिला घेण्यासाठी जातो. मात्र, मध्य प्रदेशात बायकोने घरी येण्यास नकार दिल्याने नवऱ्याने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलले आहे. बायकोने घरी परतण्यास नकार दिल्याने नवऱ्याने सासरा आणि सालीची हत्या केली. तसेच त्याने केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे.

दमोहतील सनकुइया गावातील द्रौपदीचा विवाह पन्ना जिल्ह्यातील सिमरिया गावातील बूटिया अहिरवाल याच्याशी वर्षभरापूर्वी झाला होता. लग्नानंतर सासरी भांडण झाल्याने द्रौपदी माहेरी आली होती. त्यानंतर ती सासरी गेलीच नाही. पती बूटिया तिला सजमजवण्यासाठी अनेकदा आला होता. घरी परतण्यासाठी त्याने अनेकदा तिच्या आणि सासरच्यांना विनवण्याही केल्या होत्या. अखेर द्रौपदी नकारावर ठाम राहिल्याने रागाच्या भरात त्याने मंगळवारी टोकाचे पाऊल उचलले.

बूटिया मंगळवारी द्रौपदीला समजावून घरी नेण्यासाठी आला होता. त्यावेळी द्रौपदीने नकार दिल्यावर त्यांच्यात भांडण झाले. त्यांच्यातील वाद वाढत गेला. रागाच्या भरात बूटियाने चाकू काढला आणि द्रोपदीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. द्रौपदीला वाचवण्यासाठी तिचे वडिल आणि बहीण आले. त्यांना बघून बूटियाचा राग वाढला. त्याने द्रौपदीला बाजूला करत सासरे आणि सालीवर चाकूहल्ला केला. त्यांच्यावरही त्याने सपासप वार केले. तिघांना जखमी अवस्थेत सोडून त्याने पळ काढला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. द्रौपदीचे वडिल आणि बहिणीचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर द्रौपदीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या गुन्हा दाखल केला आणि बूटियाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी काही तासातच बूटियाला अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या