जेसीबी बाजूला घेण्यास सांगितला म्हणून गोळी घालून हत्या

43

सामना प्रतिनिधी । कल्याण

कार पुढे घेण्यासाठी रस्त्यात उभा असलेला जेसीबी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग येऊन डोंबिवलीत तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विक्रांत ऊर्फ बाळू केने (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात मंगेश भगत, श्रीराम भगत, ओमकार भगत, श्रीराम नायडू, साई भगत या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आयरे गाव परिसरात भगत कुटुंबीयांच्या घराचे काम सुरू होते. या कामासाठी त्यांनी जेसीबी आणला होता. जेसीबी बाजूला घेण्याची विनंती विक्रांत याने मंगेश भगत यांना केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. वाद का घातलास याचा जाब विचारण्यासाठी पाचजण विक्रांतच्या घरी गेले. त्यांनी विक्रांतला बाहेर बोलावून मारहाण केली. मंगेश भगत याने बंदुकीने विक्रांतच्या पोटात गोळी झडली. विक्रांत जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.

आपली प्रतिक्रिया द्या