दसक शिवारात एकाचा खून

23

सामना ऑनलाईन, नाशिक

नाशिकरोडजवळील दसक शिवारात एका व्यसनाधीन, बेरोजगार पुरुषाचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून खून केल्याने खळबळ उडाली आहे.

दसक शिवारातील सायट्रिक इंडिया कंपनीच्या आवारात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) याचा मृतदेह आढळला. अज्ञाताने गळा आवळून, तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला आहे, अशी फिर्याद त्याची बहीण मनीषा विनायक पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या