धक्कादायक! संपत्तीच्या वादातून भावाची हत्या

30

सामना प्रतिनिधी । पनवेल

दोन भावांमध्ये झालेल्या संपत्तीच्या वादातून मोठया भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कळंबोलीत घडली आहे. राहत्या घरात धाकट्या भावाची धारदार सुरीने भोसकुन हत्या केली आहे. खुन केल्यानंतर आरोपी भाऊ स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला व गुन्हा कबूल केला. या घटनेनं कळंबोली शहरात एकच खळबळ पसरली आहे.

कळंबोली येथील एल.आय.जी. शहरात तुळजा भवानी मंदिराशेजारी घटना घडली. राजेश बाबल्या जाधव असे मृत युवकाचे नाव असून त्याचा मोठा भाऊ मंगेश जाधव याने दोघांमधील अंतर्गत वादातून हा खुन केला. हे दोघे त्यांच्या आईसोबत या घरात राहत होते. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोघेही दारु पित असत आणि वारंवार दोघांत वाद होत होते. दोघांमध्ये नेमका काय वाद झाला की त्याचं रुपांतर हत्येत झालं, याचा तपास कळंबोली पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या