परभणीत 25  वर्षीय विवाहितेचा खून, मृतदेह फेकला कालव्यात

परभणी जिल्ह्यात एका 25 वर्षीय विवाहित महिलेचा खून करून मृतदेह कालव्यात फेकला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार एका अज्ञात 25 वर्षे महिलेचे प्रेत आज निपाणी टाकळी येथील ग्रामस्थांना सकाळी 7 सात वाजता आढळून आले. सेलू निपाणी टाकळी रस्त्यावर शेत सर्वे क्रमांक 103 मधून गेलेल्या लोअर दुधनाच्या कालव्यात हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात 25 वर्षीय विवाहितेचा मृतदेह बांधून फेकण्यात आला. महिलेचा गळा आवळून खून करून अज्ञाताने हे प्रेत कालव्यात फेकले. या घटनेची माहिती कळताच सेलू,निपाणी टाकळी येथील रहिवाशांनी एकच गर्दी केली होती.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह  शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. हा खुनाचा प्रकार असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या