बांगला देशचा कर्णधार मुशफिकुर बाऊन्सर लागून जखमी

52

सामना ऑनलाईन । वेलिंग्टन

कसोटी सामना खेळत असताना बांगला देश क्रिकेट संघाचे कर्णधार मुशफिकुर रहिम यांच्या हेल्मेटवर बाऊंन्सर लागल्याने कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. न्यूझीलंड विरोधात कसोटी सामना खेळताना सोमवारी ही घटना घडली.

वेलिंग्टन येथील बेसीन रिझर्व्ह फिल्ड मैदानावर न्यूझीलंड विरोधात बांगला देश कसोटी सामन्याचा दुसरा डाव खेळत होता. तेव्हा ४३ व्या षटकात टिम साउदी गोलंदाजी करीत असताना त्याने टाकलेला बाऊन्सर मुशफिकुर रहिम यांच्या हेल्मेटवर लागला. त्यामुळे मुशफिकुर गुडखे टेकत जमिनीवर बसले. हा बाऊन्सर मुशफिकुर यांच्या उजव्या कानाला लागला. चेंडूचा मार लागल्यावर मुशफिकुर यांनी कान साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदना सहन न झाल्यामुळे ते गुडघे टेकत जमिनीवर बसले. तेव्हा काही गंभिर झाले असल्याची जाणीव खेळाडूंना झाली. त्यानंतर मुशफिकुर यांना स्ट्रेचरवर ठेवण्यात आले.

काही वेळ दोन्ही संघाच्या डॉक्टरांनी त्य़ांच्यावर उपचार केल्यानंतर तातडीने मुशफिकुर यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील एक्सरे चाचणीनंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुशफिकुर यांनी पहिल्या डावात १५९ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात १३ धावा करुन ते खेळत होते. यापूर्वी २०१४ मध्ये देशांतर्त स्पर्धेत खेळताना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फिलीप ह्यूज याचे बाऊन्सर लागून निधन झाले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या