बंदूक्या सिनेमातील गाण्यांना “जुंदरी झटका”

70

सामना ऑनलाईन । मुंबई

येत्या १ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या बंदूक्या सिनेमाच्या साँग लाँचचा सोहळा नुकताच अंधेरी येथील द व्हू या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडला. बंदूक्या सिनेमातील ‘माझा ईर’ आणि ‘आता सोसना’ ही गाणी तसेच ट्रेलर यावेळी दाखवण्यात आला.

निर्माते राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केलं आहे. सिनेमातील ‘माझा ईर’ हे प्रमोशनल साँग आणि ‘आता सोसना’ हे इमोशनल साँग ही दोन्ही गाणी सिनेमाची कथा नेमकी उलगडण्यात मदत करणारी आहेत. खास “जुंदरी झटका” म्हणून स्वतंत्र ओळख असणारी जुन्नर भागातली निखळ विनोदी भाषा या सिनेमातून प्रथमच महाराष्ट्राच्या चोखंदळ प्रेक्षकांसमोर येणार आहे. नामदेव मुरकुटे यांनी लिहिलेले तुफान ताल धरायला लावणाऱ्या ‘माझा ईर’ गाण्याचा जुंदरी झटका चाखून प्रेक्षकांना भन्नाट अनुभव मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या