भयंकर! मुस्लीम डॉक्टरकडून 4 हजार बौद्ध महिलांची गुपचूप नसबंदी

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेतील प्रसिद्ध ‘डिवाइन’ या वृत्तपत्रातील  एका बातमीमुळे श्रीलंकेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर एका मुस्लीम डॉक्टरने गुपचूपपणे 4 हजार बौद्ध महिलांची नसबंदी केल्याबाबतचे वृत्त छापले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी डॉक्टर हा कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटास जबाबदार असलेल्या ‘नॅशनल तौहीद जमात’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.

श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 350 लोकांना जीव गमवावा लागला तर 500 हून अधिक जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत तणावाचे वातावरण निर्माण होऊन तेथील मुस्लीमांविरोधात तेढ वाढली आहे. असे असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 23 मे रोजी ‘डिवाइन’ या वृत्तपत्राने याबाबतचे सविस्तर वृत्त छापले होते. डॉक्टर सेगू शहाबुद्दीन मोहम्मद शफी असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या डॉक्टरने कुरुनेगला येथील रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या बौद्ध महिलांवर सिझर शस्त्रक्रिया करताना गुपचूप नसबंदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिवाइनचे संपादक अनूरा सोलोमन्स यांनी पोलीस आणि रुग्णालयातील सूत्रांच्या आधारे वृत्त छापल्याचे रॉयटर्सला सांगितले आहे. तर आरोपी डॉक्टरला मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आली असून नसबंदी प्रकरणाबाबत माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या