समलैंगिक मुस्लीम महिलांवरील चित्रपट येतोय, पाहा पोस्टर

2185

समलैंगिक मुस्लीम महिलांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘शीर कुर्मा’चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महिलांच्या समलैंगिक संबंधांवर येणारा हा पहिला चित्रपट नसून या आधी देखील गर्लफ्रेंड, फायर असे काही चित्रपट आले आहेत. स्वरा भास्करने शीर कुर्मा या चित्रपटाचे पोस्टर तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात शबाना आझमी देखील दिसणार आहेत. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे. या चित्रटाचे दिग्दर्शन फराझ अरिफ अन्सारी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या