अयोध्या प्रकरणात वादाची बांग, मुस्लिम संघटना कोर्टात जाणार

541

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणात अखेर वादाला तोंड फुटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात तीस दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने रविवारी जाहीर केला. मुस्लिम समाज मशिदीच्या जागेच्या बदल्यात दुसरी जागा स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बोर्डाने मांडली. बोर्डाची याचिका न्यायालयापुढे टिकतेय का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अयोध्येत श्रीरामजन्मभूमीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला दिला. याच वेळी मुस्लिम समाजाला मशिदीसाठी अयोध्येतच पर्यायी पाच एकर जागा देण्याचा आदेश दिला. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचे बोर्डाचे वकिल जफरयाब जिलानी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मशिदीची जागा अल्लाहची आहे. शरियत कायद्यानुसार ती दुसऱया कुणालाही दिली जाऊ शकत नाही. त्या जागेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कायदेशीर लढाई लढू. 23 डिसेंबर 1949 च्या रात्री बाबरी मशिदीत भगवान रामाच्या मूर्ती ठेवणे असंवैधानिक होते. न्यायालयाने त्या मूर्तींना दैवत कसे मानले? हिंदू धर्मशास्त्र्ाानुसारसुद्धा ते दैवत होऊ शकत नाहीत, असे म्हणणे ऍड. जिलानी यांनी मांडले.

लॉ बोर्डाच्या बैठकीवर ‘सुन्नी वक्फ’चा बहिष्कार
मुस्लिम लॉ बोर्डाच्या बैठकीवर सुन्नी वक्फ बोर्ड आणि खटल्यातील मुख्य पक्षकार इकबाल अन्सारी यांनी बहिष्कार टाकला. आम्ही हिंदुस्थानचे मुस्लिम आहोत आणि हिंदुस्थानचे संविधानसुद्धा मानतो. अयोध्येचा निकाल महत्त्वपूर्ण होता. आता या प्रकरणात पुनर्विचार याचिका करण्याची आमची इच्छा नाही. जेवढा हेतू होता, तेवढे आम्ही केले. खटल्यात पक्षकार खूप होते. कोण काय करतेय, ठाऊक नाही, अशी प्रतिक्रिया देत अन्सारी यांनी gमुस्लिम लॉ बोर्डाच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली.

जिलानींना दुकान पुन्हा चालवायचेय!
मुस्लिम लॉ बोर्डाच्या भूमिकेचा हिंदू पक्षकारांनी समाचार घेतला. इकबाल अन्सारी यांचा पुनर्विचार याचिकेला नकार आहे. असे असताना जफरयाब जिलानी हे स्वतŠचे बंद होत चाललेले दुकान पुन्हा चालवण्यासाठी पुनर्विचार याचिकेचा खटाटोप करताहेत. वास्तविक न्यायालयाच्या निकालावर सामान्य मुस्लिम खूश आहेत, असे रामजन्मभूमीचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले. तर न्यायालयाच्या निकालाचा आदर केलाच पाहिजे, असे हिंदू पक्षकार धर्मदास यांनी सुनावले.

न्यायमूर्ती नजीर यांना झेड सुरक्षा
अयोध्याप्रकरणी ऐतिहासिक निकाल देणाऱया सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून नजीर यांच्या जिवाला धोका असल्याच्या माहितीवरून केंद्र सरकारने नजीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या