राम मंदिराची जागा हिंदूंना द्या, अलिगढ विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचे आवाहन

746

अयोध्येतील राम मंदिराच्या जागेबाबतची सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादाची अतिंम तारीख अवघ्या आठवड्याभरावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे देशभरात सध्या अयोध्येचा निकाल काय असेल हा चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही पक्षांनी सामंजस्याने विचार करून कोर्टाबाहेर हा तिढा सोडवावा अशी देखील मागणी अनेकांकडून होत आहे.

अयोध्येबाबत निकालावरून उत्सुकता निर्माण झालेली असतानाच अलिगढ विद्यापीठाचे माजी कुलगुरू व मुस्लीम अभ्यासक झमीर उद्दीन शाह यांनी देखील न्यायालयाबाहेरच याप्रकणाचा तिढा सोडविण्याची मागणी केली आहे. तसेच ‘मुस्लीम बांधवांनी हिंदू बांधवासाठी ती जागा सोडावी’ असे आवाहन देखील त्यांनी मुस्लीमांना केले आहे.

‘सर्वोच्च न्यायालयात लवकरच यावर निर्णय दिला जाईल. पण जरी सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांच्या बाजूने निर्णय दिला तरी त्यांना तिथे मशीद बांधणे अशक्य आहे. त्यामुळे याप्रकरणी भांडत बसण्याऐवजी मी न्यायालयाबाहेरच्या सेटलमेंटला प्राधान्य देतो’, असे शहा यांनी म्हटले आहे.

गुरुवारी राम मंदिराला पाठिंबा देणाऱ्या सलमान नादवी या मुस्लीम अभ्यासकाला काही मुस्लीम तरुणांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली होती. सलमान नादवी हे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा माजी सदस्य होते. त्यांनी राम मंदिराला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यपदावरून निलंबित केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या