भाजपमध्ये सामील झाल्याने मुसलमानांना मशिदीत नमाज पढण्यास बंदी

30

सामना ऑनलाईन। आगरतळा

त्रिपुरा येथे भाजपमध्ये नव्यानेच सामील झालेल्या मुसलमान कुटुंबांना मशिदीत जाऊन नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत तुम्ही हिंदूत्ववादी पक्षाचे समर्थन कराल तोपर्यंत तुम्ही मशिदीत नमाज पठण करू शकत नाही, असे या मुस्लीम कार्यकर्त्यांना मशिद प्रशासनाने बजावून सांगितले. यामुळे या मुसलमान कार्यकर्त्यांनी गावात पत्र्याची तात्पुरती दुसरी मशिद उभारली आहे.

दक्षिण त्रिपुरातील शांतीबाजार विधानसभा मतदार क्षेत्रात एकूण १०० कुटुंबे आहेत. त्यातील ८३ कुटुंबे मुसलमान असून यातील २५ कुटुंब भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र मुसलमान असूनही ही कुटुंबं हिंदुत्ववादी पक्षाचे समर्थन करत असल्याचे येथील मुसलमान समाजाला रुचलेले नाही. यामुळे त्यांनी या कुटुंबांना मशिदीत येण्यास बंदी घातली.

यावर तोडगा म्हणून या कुटुंबांनी गावातच पत्र्याची एक साधी मशिद उभारली असून तिथे आता ते नमाज पठण करत आहेत. आम्ही १६ महिन्यांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश घेतला तेव्हापासून आम्हाला मशिदीमध्ये नमाज पढण्यास मज्जाव करण्यात आल्याचे पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व सध्या भाजपात आलेले बाबुल हुसेन यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या