मतदार आहात? तर मग ही मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती असायलाच हवी…

89

ट्रू वोटर ॲप-

या ॲपमुळे  मतदारांचा विधानसभा, यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणे, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणे, मतदानाबाबतची माहिती घेणे, स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणे, सोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणे, कुटूंब व मित्रांचा गट तयार करणे, गैरहजर, स्थलांतरीत, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करुन कळविणे, स्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणे, आपात्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणे, एकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य आहे, निवडणूकीचा निकाल पाहणे, हे सगळं करता येईल

सिटीझन ऑन पेट्रोल (कॉप)

“कॉप” चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरीक सुलभपणे दाखल करु शकतील. या ॲपच्या माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात व काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तात्काळ तक्रार नोंदवू शकतात. या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा रिसपॉन्स टाईम अत्यंत कमी करता येईल तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास ॲपमार्फत दिसून येईल. खालीलबाबत होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल.  निवडणूक सनियंत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.

ec-app-1

कॉपच्या मदतीने मतदार पुढील गैर प्रकाराना आळा घालू शकतात. पैसे, भेटवस्तू किंवा सवलतीचे कुपन वाटप, मद्य वाटप,अग्नी शस्त्र (बंदूक, पिस्तूल, रिव्हॉलवर इ.), घोषणा व जाहिराती, बॅनर, फलक, पोस्टर, होर्डींग, सरकारी गाड्यांचा गैरवापर,इलेक्ट्रॉनिक मिडिया, पेड न्यूज, सोशल मिडिया, प्रचार रॅली, मिरवणूका, सभा, प्रार्थना स्थळांचा वापर, लहान मुलांचा वापर, प्राण्यांचा वापर, भूमिपूजन व उद्घाटन समारंभ, ध्वनिक्षेपकाचा गैरवापर, प्रचार संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या व्यक्तींनी हद्दीमध्ये वास्तव्य करणे, मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरा, इत्यांदीसाठी सिटीझन ऑन पेट्रोल हे ॲप वापरता येईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या