म्युच्युअल फंड तणावमुक्त गुंतवणूक, थेंबे थेंबे तळे साचे

आनंद म्हाप्रळकर

गेल्या आठवडय़ात आपण DEBT आणि equity बद्दल बोललो. या वेळेला आपण शेअर्स खरेदीमधला फायदा आणि धोका आणि एपंदर म्युच्युअल फंडबद्दल बोलूया. जेव्हा आपण पंपनीचे शेअर्स खरेदी करतो, तेव्हा आपली त्या पंपनीमध्ये भागीदारी असण्यासारखे आहे. जर त्या पंपनीने नफा केला तर आपला नफा आणि तोटा केला तर आपला तोटा, हे साहजिकच आहे. या धोक्याचे नियंत्रण आपण कसे करू शकतो? तर हा धोका कमी करण्याकरिता आपण एकाच पंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा जर आपण आपले पैसे उदाहरणार्थ – दहा पंपन्यांत विभागले तर आपला धोका नक्कीच कमी होईल. पण ही विभागणी कशा पद्धतीने केली पाहिजे? आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये वेगवेगळय़ा क्षेत्रातल्या पंपन्या वेगवेगळय़ा काळात प्रगती करत असतात तर मला माझे पैसे नीटपणे वैविध्यपूर्ण गुंतवायचे असतील तर पहिले मी वेगवेगळी क्षेत्रे निवडून काढेन. उदाहरणार्थ फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, बँकिंग, एनर्जी, एफएमसीजी आदी. आणि त्यानंतर त्या क्षेत्रातल्या चांगल्या चालणाऱया पंपन्या शोधून काढेन आणि मग मी माझे पैसे गुंतवेन.

आपल्याला आता बोलल्याप्रमाणे जर नियोजन करायचं झालं तर बऱयापैकी कठीण जाऊ शकतं आणि त्यात जर मला दरमहा माझ्या पगारातून काही रक्कम गुंतवायची असेल तर एवढय़ा वैविध्यपूर्ण करणं शक्य नाही, तर याकरिता म्युच्युअल फंड हे एक अत्यंत सुविधापूर्ण गुंतवणूक करण्याचे वाहन आहे. म्युच्युअल फंड म्हणजे काय, हा काही लोकांना प्रश्न असेल. काही लोक म्युच्युअल फंड म्हणजे शेअर्सदेखील समजतात. याचा मी आता खुलासा देतो. आपण जर वैविध्यतेचं उदाहरण घेतलं तर आणि समजा तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये निवेश करायचे आहे तर तुम्हाला अशा वेगळय़ा पंपन्यांचे शेअर्स घेणं शक्य होणार नाही, पण जर तुम्ही असे 100 लोक जमा केले आणि एकत्रित पैसे करून गुंतवणूक करायचे ठरविले तर ते शक्य होईल. कारण आता 100 लोकांचे मिळून तुमच्याकडे दहा लाख रुपये जमा होतील. या पैशांची तुम्ही विभागणी करून वैविध्यपणे गुंतवणूक करू शकाल, तर म्युच्युअल फंड हेच करतं. तुमच्या सारख्या समविचाराच्या असंख्य लोकांकडून पैसे आल्यानंतर त्याने नेमलेल्या फंड मॅनेजरच्या विचारांनुसार आपण कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या पंपन्यांमध्ये पैसे गुंतवून त्याच्यातून जास्तीत जास्त चांगला परतावा मिळवून देऊ शकतो, त्याप्रमाणे ते पैसे गुंतविले जातात. आता या कामाकरिता त्याला काही फी द्यावी लागते. शेअर्स पंपन्यांकडे विश्लेषण करण्यासाठी मोठी टीम असते, जी सामान्य व्यक्ती करू शकत नाही. म्हणून ज्यांना शेअर्स आणि इक्विटीची माहिती नसेल, शिस्तबद्ध गुंतवणूक करायची असेल आणि गुंतवणुकीसाठी पंपन्यांचा अभ्यास करायचा वेळ नसेल तर म्युच्युअल फंड हे अत्यंत उपयोगी आणि तणावमुक्त ठरेल, पण आता म्युच्युअल फंडदेखील विविध श्रेणीचे आहे आणि प्रत्येक पंपन्यांचे फंड मॅनेजर आहेत तर आपल्यासाठी योग्य कुठली पंपनी आणि श्रेणी आहे हे कुठल्या योग्य आर्थिक सल्लागाराकडून समजून घेणं योग्य ठरेल. आता पुढच्या भागामध्ये म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल चर्चा करू.

ज्यांना शेअर्स आणि इक्विटीची माहिती नसेल, शिस्तबद्ध गुंतवणूक करायची असेल, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड तणावमुक्त गुंतवणूक ठरेल.

(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)
[email protected]