कोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबांची तपासणी, पुण्यात 182 गावांचे सर्वेक्षण पूर्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली तर पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 182 गावांचे आणि तेरा नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी याकेळी व्यक्त केला.

‘माझे कुटुंब -माझी जबाबदारी’ या मोहिमेला राज्यात सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोकण आणि पुणे विभागाचा आढावा घेतला.

आक्रमक ट्रिटमेंटचे दुष्परिणाम

रेमेडिसिव्हीर तसेच इतर औषधांच्या वापराबाबत डॉक्टरांनाच ठरवू द्या. आक्रमक ट्रिटमेंटमुळे दुष्परिणाम होऊ शकतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

पुणे जिल्ह्यात उद्योग, कारखाने मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे ‘माझी फॅक्टरी, माझी जबाबदारी’, ‘माझी हौसिंग सोसायटी, माझी जबाबदारी’ ‘माझा वॉर्ड, माझी जबाबदारी’ ही योजना राबवण्यात येणार आहे.

कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण  झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या