‘माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी’ शॉर्ट फिल्म स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद , 1044 स्पर्धकांनी नोंदवली नामांकने

 ‘माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी’ विषयावर युवा सेनेच्या वतीने शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत तब्बल 1044 स्पर्धकांनी आपली नामांकने नोंदविली आहेत, अशी माहिती युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांनी दिली.

राज्यात वाढलेला कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येण्यासाठी राज्यशासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राज्यभर राबविली होती. त्या पार्श्वभूमीवर युवा सेनेतर्फे शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे.ही स्पर्धा विनाशुल्क होती. फिल्मची वेळ मर्यादा 3 मिनिटे होती. चित्रीकरण मोबाईल/कॅमेराद्वारे करण्याची मुभा होती. त्याच्या नोंदणीची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर होती.या स्पर्धेला संपूर्ण देशभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. या स्पर्धेच्या प्रवेश प्रकियेत एकूण 1044 स्पर्धकांनी नामांकन नोंदविली आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱयाला 50 हजार, दुसऱया क्रमांकाला 30 हजार आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱयाला 20 हजार रुपये पारितोषक देण्यात येणार आहे. निकाल 31 ऑक्टोबर रोजी लागणार असल्याची माहिती आयोजक अमोल परब यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या