राहुलमुळेच माझा मुलगा पायलट, निर्भयाच्या आईची कृतज्ञता

32
nirbhaya mother

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

डिसेंबर २०१२ मध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराने बळी घेतलेल्या निर्भयाचे कुटुंब त्या आघाताने पार कोसळून गेले होते. त्यातच घरातील परिस्थितीही बेताचीच होती. तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निर्भयाचा भाऊ पायलट बनला आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर लवकरच तो गगनभरारी घेणार आहे.

‘माझा मुलगा सागर हा राहुल गांधी यांच्यामुळेच पायलट होऊ शकला’ अशी कृतज्ञतेची भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. राहुल यांनी सागरच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला.

आपली प्रतिक्रिया द्या