ड्रम, समुद्र आणि अल्पवयीन मुलाचा म्यानमार ते बांग्लादेश लाटांवरील प्रवास

30

सामना ऑनलाईन । ढाका

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापासून स्वतःला वाचण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने फक्त एका तेलाच्या ड्रमच्या सहाय्याने म्हानमार ते बांग्लादेश असा सागरी प्रवास केला आहे. नबी हुसैन (१३) असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

अंतर्गत कलहामुळे म्यानमारमधील परिस्थिती खराब आहे. त्यामुळे अनेकांना आपले राहते घर सोडून इतरत्र आसरा शोधावा लागला आहे. अशातच नबीने जीव वाचवण्यासाठी समुद्रामध्ये उडी घेतली आणि एका पिवळ्या रंगाच्या तेलाच्या ड्रमला कडकडून मिठी मारून बसला. समुद्राच्या अवाढव्य लाटांपासून वाचत नबीने अडीच मैलांचे म्यानमार ते बांग्लादेश हे अंतर पार केले आणि जीव वाचवला.

मागील आठवड्यामध्ये तीन डझन मुलांनी सागरी मार्गाने शाह पुरीर द्वीप येथे पाऊल ठेवले. त्या मुलांमध्ये नबीदेखील होता. नबी बांग्लादेशमध्ये कोणालाही ओळखत नाही. त्याचे कुटुंब म्यानमारमध्ये आहे. नबीला आणखी ८ भावंडे आहेत. एकूण ९ भावंडांपैकी नबी चौथ्या नंबरचा मुलगा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या