वाळवंटात दिसलेली विचित्र वस्तू रोमानियात दिसून झाली अदृश्य…’एलियन’बाबत पुन्हा चर्चा…

अमेरिकेच्या वाळवंटात वैमानिकाला दिसलेल्या रहस्यमय वस्तूबाबतच्या चर्चा पुन्हा झाल्या आहेत. अमेरिकेच्या दुर्गम भागातील वाळवंटात एका वैमानिकाला धातूचा मोठा खांब (मोनोलिथ) दिसला होता. तो मोनोलिथ अदृश्य झाल्यानंतर चार दिवसांनी रोमानियात दिसला आहे. रोमानियात दिसलेला हा मोनोलिथ काही स्थानिकांनी खोडपणाने ठेवला आहे की खरोखरच यामागे एलियनचा हात आहे, अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

अमेरिकेच्या वाळवंटात हा मोनोलिथ दिसल्यानंतर या दुर्गम भागात कोणी आणि का आणला तसेच या निर्जन भागात खांब उभारण्याचे प्रयोजन काय, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. काहीजणांनी हा रहस्यमयी एलियनचा खांब असण्याची शक्यता वर्तवली होती. एलियनच्या यानातील किंवा तबकडीचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे एलियनबाबतच्या चर्चा सुरू होत्या. हा खांब जसा अचानक दिसला होता. तसाच अचानक गायब झाला होता.

अमेरिकेच्या वाळवंटातून गायब झाल्यानंतर चार दिवसांनी तो मोनोलिथ रोमानियात दिसला आहे. त्यामुळे या मोनोलिथबाबत चर्चा सुरू झाली आहे. रोमानियाच्या डोंगराळ भागातील नीम काऊंटीतील डॅसियन किल्ल्याबाहेर हा मोनोलिथ दिसला आहे. असाच मोनेलिथ दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या वाळवंटात दिसला होता. मात्र, चार दिवसांपूर्वी तो अचानक अदृश्य झाला होता.

अचानक गायब झाल्यानंतर मोनोलिथ रोमानियात दिसला होता. त्यानंतर आठवडाभर तो रोमानियात दिसत होता. त्यानंतर आता रोमानियातूनही तो गायब झाला आहे, असे रोमानियातील पत्रकार जियार पियात्रा यांनी सांगितले. सुमारे 9 फूट उंचीचा हा मोनोलिथ कोणी,का आणि कशासाठी आणला होता. तसेच तो कोणी आणि कुठे नेला याबाबत कोणालाही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील मोनोलिथ आणि रोमानियात आढळलेला मोनोलिथ यात फरक असल्याचे सांगण्यात आले. रोमानियातील मोनोलिथच्या वेल्डिंगचा दर्जा सुमार होता. तसेच तो दगडी भागात व्यवस्थित उभा करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांनी खोडसळपणाने हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अमेरिकेच्या वाळवंटात असलेल्या मोनोलिथ चांगल्या दर्जाचा होता. तसेच त्या निर्जन आणि दुर्गम भागात मोनोलिथ उभारणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

रोमानियातील स्थानिक प्रशासनाने घटनेची दखल घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे. ड्रसियन किल्ला संरक्षित क्षेत्र असून अशाप्रकारची कृती बेकायदा आहे. यात स्थानिकांचा खोडसाळपणा आढळल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आठवड्याभरानंतर हा मोनोलिथ पुन्हा गायब झाला असून नेमका कोणी नेला, याबाबत चर्चा होत आहे. या मोनोलिथच्या निमित्ताने पुन्हा एकदा एलियन आणि त्यांच्या रहस्यमय तबकडीची चर्चाही पुन्हा सुरू झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या