नागिणला मिळाली ‘गोल्ड’न ऑफर

24

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या पडद्यावरील नागिण या मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय आता लवकरच मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावणार आहे.मौनी लवकरच अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या आगामी सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हिंदुस्थानला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक आणि ते मिळवण्यापर्यंतचा प्रवास यावर हा सिनेमा आधारलेला आहे. ऑगस्टमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून मौनीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या संयुक्त निर्मितीत हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या