अभिनेत्रीला मैत्रिणीने केली मारहाण, कारण वाचाल तर तुम्हालाही धक्का बसेल

6605
फोटो सौजन्य-https://www.spotboye.com

हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या नलिनी नेगी या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये तिला बेदम मारल्याचे स्पष्टपणे दिसतंय. ‘नामकरण’ या मालिकेमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीने तिला झालेल्या या मारहाणप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीमध्ये तिने तिच्या मैत्रिणीवरच मारहाणीचा आरोप लावला आहे.

SpotboyE या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटलंय की नलिनी आणि मैत्रीण प्रीती राणा या दोन वर्षांपूर्वी एकत्र राहायच्या. नलिनी काही महिन्यांपूर्वी ओशिवरा इथे नव्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. प्रीतीने तिला फोन करून माझ्याकडे सध्या राहायला घर नाहीये, मला घर मिळेपर्यंत मी तुझ्यासोबत राहू शकते का असं विचारलं होतं. नलिनीने तिचा २ बेडरुमचा फ्लॅट असल्याने प्रीतीला होकार दिला होता.

नलिनीच्या घरात राहायला आल्यानंतर काही दिवसांत प्रीतीने तिच्या आईला देखील या फ्लॅटमध्ये राहायला आणलं. सुरुवातीला नलिनीला वाटलं की घर शोधायला मदत व्हावी यासाठी प्रीतीने तिच्या आईला बोलावलं असेल. एकेदिवशी नलिनी जिममधून परत येत असताना प्रीतीच्या आईने तिला गाठलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. याबाबत नलिनीने प्रीतीकडे तक्रार केली तेव्हा प्रीतीनेही तिला शिव्या दिल्या. घरी आल्यानंतर प्रीती आणि तिच्या आईने पुन्हा एकदा नलिनीशी भांडायला सुरुवात केली. या दोघींनी मिळून नलिनीला बेदम मारलं असं तिचं म्हणणं आहे. या दोघींना माझा जीव घ्यायचा होता असा आरोप नलिनीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या