पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक

104

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांना अटक करण्यात आली आहे. नॅशनल अकाऊंटॅबीलीटी ब्यूरोच्या 12 जणांच्या पथकाने (National Accountability Bureau – भ्रष्टाचार विरोधी विभाग) अब्बासी यांना अटक केली आहे. 220 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एनएबीने त्यांना अटक केली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते अब्बासी हे नवाज शरीफ यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते.

याआधी पाकिस्तानच्या एनएबीने माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनाही आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. आता माजी पंतप्रधानांनाही अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या