त्या ग्राहकाची हजामत करणार नाही, ‘नाभिक एकता मंच’कडून जाहीर निषेध

78

सामना प्रतिनिधी, नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील मिशी कापल्याचे प्रकरण चांगलेच गरम झाले आहे, या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटायला लागले. नाभिक दुकानदारांच्या संघटना व जिह्यातील नाभिक एकता मंचने मिशी गमावलेल्या किरण ठाकूर यांच्या कृत्याचा जाहीर निषेध केला. तसेच याप्रकरणी सोमवारी (22 जुलै) जिल्हाभरातील तीनशेवर नाभिक बांधवांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे ठाकूर यांची दाढी, केस न कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाभिक संघटनेने कन्हानमध्ये घेतलेल्या पत्रकार पत्रपरिषदेतून आपली भूमिका मांडली. सोमवारी कन्हान येथे बहुसंख्येने एकत्र येऊन डीवायएसपींना निवेदन देण्यात येईल. घटनेच्या दिवशी ठाकूर यांच्या सांगण्यावरून कारागिराने त्यांची मिशी काढली त्यानंतर परत दुकानात येऊन कारागिरीशी वाद घालून ठार मारण्याची धमकी देणे, ही बाब ग्राहक म्हणून उचित नव्हती आम्ही प्रामाणिकपणे सेवा द्यायची की कोर्टकचेऱया करायच्या, असा उद्विग्न सवाल जिल्हाध्यक्ष शरद वाटकर यांनी यावेळी केला.

कारागीराचा दोष नाही
याबाबत आपण स्वतः कन्हान येथील फ्रेण्ड्स जेन्ट्स पार्लरचे मालक सुनील लक्षणे व त्यांचा कारागीर आकाश चौधरी यांची भेट घेतली वस्तुस्थिती समजून घेतली यात कारागीराचा कुठेही दोष आढळून आला नाही एक प्रामाणिक कारागीर म्हणून त्याने ठाकूर यांची दाढीमिशी केली याउलट त्याला आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्यात आले. ही बेबंदशाही असल्याचा आरोप वाटकर यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या