निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून भाजपमध्ये राडा; स्थानिक नेत्यांकडून केंद्रीय नेतृत्त्वाचा निषेध

bjp

पुढील महिन्यात मतदान होणार असलेल्या राज्यातील जागावाटप व्यवस्थेला भाजपची नागालँड युनिट विरोध करत आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांचे म्हणणे न ऐकल्यास पक्षाच्या राज्य युनिटने सामूहिक राजीनामा देण्याची धमकी दिली आहे.

त्यांनी आगामी निवडणुकीत 50-50 जागा वाटपाची मागणी केली आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, टेमजेन इम्ना अलँग आणि उपमुख्यमंत्री वाय पॅटन यांनी मंगळवारी गुवाहाटी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे संयोजक हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतील.

‘मेघालयात भाजपचे फक्त दोन विद्यमान आमदार असताना आणि सर्व 60 मंडलांमधून निवडणूक लढवत असताना, नागालँडला 60 पैकी केवळ 20 जागा लढवण्याची परवानगी देऊन सावत्र आईसारखी वागणूक का दिली जात आहे?’ अशा पोस्टर्ससह स्थानिक भाजप नेत्यांनी निषेध केला.

‘आसामच्या हिमंता बिस्वा सर्मा यांना दुसऱ्या राज्याचे भविष्य ठरवण्याचा अधिकार का आहे? पंतप्रधान मोदींना का नाही?’, असा सवाल उपस्थित केला जात आहे.