आमटे कुटुंबीयांच्या त्रासामुळे शीतलची आत्महत्या, सासू-सासऱ्यांचा आरोप

sheetal-amte

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या संशयास्पद मृत्यूमागे आमटे कुटुंबीयांकडून दिलेला त्रास कारणीभूत असल्याचा आरोप डॉ. शीतलच्या सासू सुहासिनी आणि सासरे शिरोष करजगी यांनी समाज माध्यमांवर पत्र टाकून केला आहे. या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने जप्त केलेले साहित्य नागपूर आणि चंद्रपूरला बुधवारी पाठविण्यात आले असून, त्यांच्या अहवालाला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

जगप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल यांचा 30 नोव्हेंबरला संशयास्पद मृत्यू झाला होता. कुटुंबीयांकडून दिला जात असलेला त्रास सहन न झाल्यामुळे शीतलने स्वत:ला संपवल्याचे पत्रात नमूद आहे. तिच्या मानसिक आजाराबद्दल काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित झाले होते. त्यावरून तिच्या कुटुंबीयांकडून अन्याय होत असल्याचे सिद्ध होते. आमटे कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच एक संयुक्त निवेदनसुद्धा दिले होते. यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी काय असू शकते, असाही आरोप त्या पत्रात केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या