नगरमध्ये शहर बससेवा झाली बंद! नागरिकांचे हाल

27

सामना प्रतिनिधी । नगर

महापालिका प्रशासनाने थकवलेली ८० लाखांची नुकसान भरपाई व करारनाम्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी नोटीस बजावूनही दखल न घेण्यात आल्यामुळे अभिकर्ता संस्था यशवंत ऑटो प्रायव्हेट लिमिटेडने शहर बससेवा (एएमटी) आजपासून बंद केली आहे. सर्व गाड्यात डेपोतच असून एकही गाडी रस्त्यावर नसल्याचे संचालक धनंजय गाडे यांनी सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून शहर बस सेवा बंद होणार अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र पालिका प्रशासन ढिम्म बसून होते. त्यामुळे अखेर आज ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना मात्र रिक्षाचा पर्याय निवडवा लागत असून बस सेवा बंद असल्यांने संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या