मला मिळालेला पुरस्कार हा गावकऱ्यांचा – पोपटराव पवार

995

लोकसहभागाचे महत्त्व हे जनतेला पटवून देण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी गेल्या तीस वर्षापासून एकत्रितपणे येऊन पाणी आडवा पाणी जिरवा यांच्यासह, विविध उपक्रम हाती घेतले व याला प्रशासकीय जोड सुद्धा मिळत गेली. इतरांचे सुद्धा सहकार्य मिळाले हा पुरस्कार हा गावकऱ्यांचा सन्मान वाढवणारा आहे, असे वक्तव्य पोपटराव पवार यांनी केले आहे.

आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तसेच आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांना शनिवारी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्याशी संपर्क केला असता पोपटराव पवार यांनी श्रमदानातून उभारलेली चळवळ ही लोकांपर्यंत गेली, ते पोचण्यासाठी सर्वांचे सहकार्य आपल्याला मिळाले गावकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या तीस वर्षापासून वेगवेगळे उपक्रम राबवले व आदर्श असे गाव उभे केले. या उभारणीमध्ये मला प्रशासकीय पातळीवर तसेच राजकीय पातळीवर आणि त्यांचे पाठबळ मिळाले. तसेच माध्यमांनी सुद्धा वेळी आमच्या पाठीशी उभे राहून गावकऱ्यांना साथ दिली. हे गाव आदर्श गाव म्हणून आज देशामध्ये नावारूपाला आलेलं आहे. मला हा सन्मान मिळाला हा सन्मान गावकऱ्यांचा सन्मान आहे, अशा शब्दात पोपटराव पवार याणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या