पंतप्रधान, मुख्यमंत्री थेट जनतेमधून निवडा!: हजारे

सामना ऑनलाईन । नगर

महाराष्ट्र सरकारने नगराध्यक्षांपाठोपाठ ग्रामपंचायतींचे सरपंचही थेट लोकांमधून मतदान घेऊन निवडण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेचे असे विकेंद्रीकरण करणार असल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री थेट जनतेमधून निवडावेत अशी अपेक्षा समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

सरपंच थेट लोकांनी निवडल्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होणार असेल आणि लोकशाही मजबूत होणार असेल तर चांगलेच आहे. मग याच धर्तीवर लोकशाही अधिकाधिक सक्षम करण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री थेट जनतेमधून निवडायला हवेत अशा स्वरुपाची अपेक्षा समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या