उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरली आहेत. 92 दिवसात नाशिक भागातील धरणांमधून जायकवाडीकडे 40 हजार 155 दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे. परतीचा पाऊस चांगल्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
1 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये तर कंसातील आकडे एकूण पावसाचे
दारणा 3 (1225), मुकणे (1289), वाकी (2043), भाम (2844), भावली 2 (3499), वालदेवी (860), गंगापूर (1308), काश्यपी (1166), गौतमी (1432), कडवा 0 (671), आळंदी (863), पालखेड (319), करंजवण (816), ओझरखेड (781), वाघाड (854), नांदुर मध्यमेश्वर (294), नाशिक (814), घोटी (1661), ईगतपुरी (2928), त्रंबकेश्वर (2049), देवगांव 3 (465), ब्राम्हणगांव 4 (448), कोपरगांव 9 (412), पढेगांव (420), सोमठाणे 5 (215), कोळगांव 2 (436), सोनेवाडी 7 (262), शिर्डी 10 (459), राहाता 11 (339), रांजणगांव खुर्द 11 (349), चितळी 25 (355), याप्रमाणे पाउस झाला आहे.
धरणांतील पाणीसाठ्याची आकडेवारी टक्केवारीमध्ये, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये
दारणा 96.28 टक्के (6883 दलघफु), मुकणे 87 टक्के (6319) वाकी 92 टक्के (2301), भाम 100 टक्के (2464), भावली 100टक्के, (1434), वालदेवी 100 टक्के (1133), गंगापुर 93 टक्के (5271), काश्यपी 96 टक्के (1787), गौतमी 91 टक्के (1714), कडवा 86 टक्के (1452), आळंदी 100टक्के (816), पालखेड 87 टक्के (569), करंजवण 99 टक्के, (5338), ओझरखेड 100 (2130), वाघाड 100 टक्के (2302), असा पाणीसाठा आहे.
चालू पावसाळी हंगामात पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची लागवड काही प्रमाणात वाढणार आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुरेसे पाणी मिळणार असून पुढच्या वर्षाची पाणीटंचाई मिटली आहे. सोमवार सकाळपासूनच पावसाने रिप रिप सुरू केली होती. त्यामुळे आठवडे बाजार आणि शेतकऱ्यांच्या पोळा सणावर काहीसे विरजण पडले.