Nagar News : बेकरी मजुरांवर तलवारीने हल्ला; आरोपींना स्थानिक गु्न्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नगर शहरामध्ये काही दिवसांपुर्वी बेकरी मजुरांवर तलवारीने खूनी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात मजुरांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईला तत्काळ सुरवात केली होती. या घटनेतील आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

नगर शहरातील फाईव्ह स्टार बेकरीमध्ये मोहम्मद जैद मोहम्मद जाईन अन्सारी (वय 18) हा उत्तर प्रदेशचा रहिवासी कामाला आहे. दिनांक 18 जून 2024 रोजी रात्री सहा ते सात जणांनी अन्सारी व हॉटेलमधील इतर सहकाऱ्यांवर तलवार व लाकडी दांडक्याच्या सहय्याने हल्ला केला. य घटनेत मजुरांना गंभीर दुखापत झाली होती. घटना घडल्यानंतर तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे विभागाच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथके नेमून आरोपींचा शोध सुरू केला. तपास केला असता हा गुन्हा आरोपी कुणाल खंडेलवाल व त्याच्या इतर साथिदारांनी केल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी जयेश लक्ष्मीकांत लसगरे, रा.लोंढेमाळ, कल्याणरोड याला ताब्यात घेतले. आरोपी जयेशने दिलेल्या माहितीनंतर इतर आरोपी सोमनाथ व आकाश यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरीत तीन्ही आरोपी पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. जयेश लक्ष्मीकांत लसगरे (वय 21), आकाश सुनील पवार (वय 21), ईश्वर शिंगाडे, सोमनाथ शिंदे, आकाश पवार, अथर्व पवार अशी आरोपींची नावे आहेत.

सदर गुन्ह्याची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भारती यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलील उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार राजेंद्र वाघ, रविंद्र कर्डीले, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन अडबल, संतोष लोंढे, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, फुरकान शेख, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.