अफवांच्या बातम्या करू नका! नागार्जुन वृत्तवाहिन्यांवर संतापला

तेलुगू अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रुथ प्रभू यांनी घटस्फोट घेतला आहे. दोगे काही दिवसांपासून वेगळे झाले असून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, दोघांमध्ये टोकाचे मतभेद होऊन दोघांनी घटस्फोट घेणं हे नागा चैतन्य आणि समांथाच्या चाहत्यांना रुचलं नव्हतं. यातच नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांची एक बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखवायला सुरुवात केली होती. या बातमीवरून नागार्जुन संतापले असून त्यांनी त्यांचा संताप ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.

नागार्जुन यांनी हे ट्विट करत असताना बातम्या द्या अफवा पसरवू नका (#GiveNewsNotRumours)असा हॅशटॅगही जोडला आहे. काही वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर एक अफवा पसरवणारी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं की समांथाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. नागा चैतन्य त्यासाठी तयार होता मात्र त्याला नागार्जुन आणि त्याच्या कुटुंबाची चिंता सतावत होती. नागार्जुन यांना काय वाटेल, कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे काय असे प्रश्न नागा चैतन्य याला सतावत होते. नागा चैतन्य याने नागार्जुन यांना बरंच समजावलं कारण त्यांना बरंच टेन्शन येईल असं नागा चैतन्यला वाटत होतं, असं या अफवा पसरवणाऱ्या बातमीत म्हटलं होतं.