कोलकाता येथील डॉक्टर तरुणीसोबत जे घडले तेच तुमच्यासोबत करेन अशी धमकी देणाऱ्या नागपूर येथील रिक्षाचालकाला दोन शाळकरी विद्यार्थीनींनी चोपून काढले आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दोघी विद्यार्थीनी रिक्षात मागे गप्पा मारत बसल्या होत्या. रिक्षाचालकाने त्यांना मागे बसून मोठ्याने बोलू नका सांगितले आणि त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. वाद एवढा वाढला की चालकाने कोलकात्याच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाचा संदर्भ देत विद्यार्थिनींना धमकी दिली. कथितपणे विद्यार्थींनींना धमकावून कोलकात्यात मुलीसोबत जे घडले तेच मी तुमच्यासोबत करीन अशी धमकी दिली. मुलींनी लगेच रिक्षा थांबवायला सांगितली आणि त्याला बाहेर खेचून चांगला चोप दिला. त्यानंतर मुली मारत असल्याचे पाहून तेथील स्थानिकही धावले. त्यांना खरा प्रकार कळल्यावर त्यांनीही त्या चालकाला चांगलेच चोपले.
जैसे कोलकाता में हुआ है, वैसी ही क्रुरता तेरे साथ करूँगा!_
आटो चालक ने एक लड़की से कहा जैसे कोलकाता में हुआ है, वैसी ही क्रुरता तेरे साथ करूँगा!
पकड़ा गया जनता ने मार-मार कर भरता बना दिया pic.twitter.com/4dgTmb0ieO
— Dr. Emiliya 🛕🚩 (@DrEmiliya) August 22, 2024
या घटनेचा कथित व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यात, लोकं रिक्षा चालकाला चोपताना दिसत आहे. ‘तू सुरक्षित आहेस, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत’, असे म्हणत एक महिला घाबरलेल्या शाळकरी मुलीला धीर देताना दिसत आहे. त्यानंतर मुलीने रिक्षाचालकाला चोप दिला.