नागपूरात १५१ जागांसाठी तब्बल ११४१ उमदेवार

31

नागपूर-

महानगरपालिका निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली असून सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत़. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची व अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून सर्व चित्र स्पष्ट झाले आहे़. नागपूर महानगपालिकेच्या १५१ जागांसाठी तब्बल ११४१ उमदेवार रिंगणात असून ४३३ उमदेवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले गुरुवारपासून संत्रानगरीत प्रचाराचा धुराळा उडेल.

येत्या २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे़. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशपत्रांची छाननी करण्यात आली़. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख होती. यंदा संगणकीय प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले.

१५७४ पैकी ४३३ उमेदवारांची माघार

या निवडणुकीकरिता एकूण १८१३ उमदेवारांनी नामनिर्देशपत्र अर्ज भरले होते. काही उमेदवारांनी दोन अर्ज भरले होते तर काहींनी आॅनलाईन अर्ज भरले मात्र अर्जाची प्रिंट आऊट व अन्य कागदपत्रे निवडणूक विभागाकडे सादर केली नव्हती़. त्यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरणाऱ्या उमदेवारांची संख्या १५७४ इतकी होती.  यापैकी ६ फेब्रुवारी रोजी ८१ आणि ७ फेब्रुवारी रोजी ३५२ अशा एकूण ४३३ उमदेवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १५१ जागांसाठी ११४१ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या