तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडताच नागपूरकरांच्या भाजप विरोधात घोषणा

1611

राज्याच्या उपराजधानीतील नागपूर महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व भाजप नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा विस्पह्ट झाला. आयुक्तांनी नागपूर सोडून गेले पाहिजे अशा वक्तव्यापासून आयुक्तांचा एकेरी उल्लेख करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे संतप्त झालेले तुकाराम मुंडे यांनी सभागृहातून ‘वॉकआऊट’ केले. तर दुसरीकडे सभागृहाच्या बाहेर तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ शेकडो नागरिकांनी आंदोलन केले आणि हातात फलक घेऊन सत्ताधारी भाजपचा निषेध केला.

नागपूर महापालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनाच्या संकटामुळे तीन महिने लांबणीवर पडली होती. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात नगरसेवकांची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी सर्वसाधारण सभा बोलावली होती. नगरसेवकांच्या आरोपांना आयुक्त मुंढे उत्तर देत असताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर माझे बोलणे तर पूर्ण होऊ द्या असे आयुक्त म्हणाले. त्यावर आयुक्त चुकीची उत्तर देत असतील आणि त्यावर हरकतीला मुद्दा उपस्थित केल्याने वाईट वाटत असेल तर आयुक्तांनी नागपूर सोडून जावे असे तिवारी म्हणाले. काँग्रेस सदस्य हरिश ग्वालबंसी यांनीदेखील आयुक्त हे जनतेसाठी हितकारक नसून, लोकशाहीला न मानणारे आहेत. इंग्रजांची कार्यपद्धती काही वेगळी नव्हती, लोकशाही त्यांना आवडत नाही, एक संत तुकाराम महाराज होते आणि हे एक आहेत असे वक्तव्य ग्वालंबसी यांनी केले.

आयुक्तांचा एकेरी उल्लेख
या सर्व प्रकारामुळे आयुक्त मुंढे संतप्त झाले आणि ते सभागृहातून बाहेर निघण्याच्या तयारीत होते. तेव्हा सभागृहातील एका नगरसेवकाने त्यांना ए रुक… अशी जोरात शेरेबाजी केली. त्यावर आयुक्त थांबले रागाने वळून पाहिले आणि काहीही न बोलता निघून गेले

आयुक्तांची मनधरणी
आयुक्त निघून गेल्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य प्रफुल्ल गुडधे यांनी आयुक्तांना पुन्हा सभागृहात बोलावण्याची विनंती अतिरिक्त आयुक्त, व महापौरांना केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटे तहकूब झाले. आयुक्तांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले. पण ज्या सभागृहात आयुक्तांचा मान राखला जात नाही अशा सभागृहात मला येण्याची इच्छा नाही असे सांगत तुकाराम मुंडे पुन्हा सभागृहात आले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या