नागपूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिनशे कोटींची संपत्ती बळकावण्यासाठी चक्क सूनेनेच सासऱ्याच्या हत्येचा कट रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याला अपघाताचे असल्याचे भासवले. पोलिसांनी तपास केला असता हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी कसून चौकशी केली असता सूनेने अपघात घडवून आणल्याचा गुन्हा कबूल केला.
22 मे रोजी नागपूरच्या बालाजी नगर येथे हिट अँड रन प्रकरण घडले होते. भरधाव वेगात आलेल्या कारने पुरुषोत्तम पुत्तेवार (72) यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी तपासात हा खुनाचा गुन्हा असल्याचे समोर आले. पुरुषोत्तम यांची पत्नी शकुंतला यांची शस्त्रक्रिया झाल्याने त्या रुग्णालयात होत्या. रुग्णालयात असलेल्या पत्नीला भेटून परतत असताना हा अपघात घडला होता. पुरुषोत्तम यांचा मुलगा मनीष हा डॉक्टर आहे. चौकशीदरम्यान मनीषची पत्नी अर्चना पुट्टेवार संशयास्पद दिसली.त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा मान्य केला.
.याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुश्री पुट्टेवार यांनी अपघात घडवून आणण्यासाठी चक्क 1 कोटी रुपयांची खंडणी दिली. तिने सासऱ्यांना मारण्यासाठी सहआरोपींना जुनी कार विकत घेण्यासाठी पैसे दिले जेणेकरून हा खून अपघातासारखा होऊ शकेल. सासऱ्यांच्या 300 कोटींच्या संपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी तिने हा सर्व कट रचला होता. तिने पतीचा ड्रायव्हर बागडे आणि अन्य दोन आरोपी, नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला होता. पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत खून आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन कार, सोन्याचे दागिने आणि मोबाईल जप्त करण्यात आले त्यांना चिरडले. त्यांचा मुलगा आणि अर्चनाचा नवरा मनीष डॉक्टर आहे.
नगररचना विभागाच्या सहायक संचालक अर्चना मनीष पुत्तेवार हिला मंगळवारी अटक करण्यात आली. तिला 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.