दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद, नरेश बडोले यांना वीरमरण

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. बडगाम जिह्यात दहशतवाद्यांडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्त पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते. उपचारादरम्यान ते शहीद झाले. नरेश बडोले मुळचे नागपूरचे होते.

बंदिपोरा परिसरात सकाळी हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. गोळीबारात नरेश बडोले गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला.

आपली प्रतिक्रिया द्या