नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नागपूरचा जवान शहीद

छत्तीसगड मधील कोहकामेटा परिसरातील जंगलात कोंम्बिंग दरम्यान नक्षल्यानी पेरून ठेवलेल्या भुसुरूंगामुळे झालेल्या स्फोटात इंडो तिबेट बॉर्डर पोलीस कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल मंगेश हरिदास रामटेके (41) रा.सिद्धार्थ नगर भिकापूर शहीद झाला. शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता या घटनेची माहिती पोहचताच शहरात शोककळा पसरली.

शहीद मंगेशचा लहान भाऊ दिनेश याचे जुलै महिन्यात लग्न होते. या लग्नाला ते येणार होते. मंगेशचा विवाह 2013 मध्ये राजश्री नावाच्या मुलीशी झाला होता. त्यांना तक्ष नावाचा सात वर्षाचा मुलगा आहे. वडील हरिदास हे वनविभागात सेवानिवृत कर्मचारी आहेत.

जानेवारी महिन्यात ते भिकापूरला येऊन गेले असल्याची माहीती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. शुक्रवारलाच त्यांचे पत्नीशी बोलणे झाले. हे बोलणे शेवटचेच ठरले. छत्तीसगड मधील कोहकामेटा परिसरातील जंगलात कोम्बींवर असतांना नक्षल्यांनी केलेल्या स्फोटात ते शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना कळताच त्यांच्यावर दुखःचा डोंगर कोसळला. शनिवारी शहीद मंगेशकर यांच्यावर मरू नदीच्या घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली असून शहरवासियांनी आपली दुकाने, प्रतिष्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद ठेवून शहीद मंगेशला आदरांजली वाहिली.

आपली प्रतिक्रिया द्या