‘सीएमआरएस’कडून महामेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘सीएमआरएस’कडून नुकतेच महामेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे मेट्रोच्या संपूर्ण बांधकाम आणि इतर कार्यप्रणाली सुरक्षित असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे मेट्रो आता काही दिवसात जॉय राइड सुरू करणार आहे. खापरी ते विमानतळापर्यंत मेट्रो निशुल्क चालविण्यात येणार आहे. तर मार्च २०१९ पासून प्रत्येक नागरिक हे तिकीट घेउन मेट्रोनी प्रवास करू शकणार असा विश्वास महा मेट्रोचे संचालक ब्रजेश दीक्षित यांनी दिली.

बुधवारी मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दीक्षीत यांनी सांगितले की, ‘येणाऱ्या काही दिवसांतच ५ किमीपर्यंत मेट्रो ही मोफत धावणार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि विभीन्न संस्थांना त्यांच्या निवेदनानुसार जॉय राइडचा आनंद उपभोगता येणार आहे. यामध्ये तीन स्टेशन राहणार आहेत. ज्यामध्ये खापरी, एअरपोर्ट आणि एअरपोर्ट स्टेशन यांचा समावेश आहे. यापुढच्या लाइनला पूर्ण करण्याचा मेट्रोचा निश्चय आहे. मेट्रोने ठरविलेल्या निश्चयानुसार २०१९ च्या मार्चपर्यंत नागपूर ते बर्डी ही पहिली मेट्रो सुरू होणार आहे. ज्यासाठी नागरिक तिकीट घेउन प्रवास करू शकतील,’ असेही दीक्षीत म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, या वर्षिच्या ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत रीच वन मध्ये येणाऱ्या स्टेशनचे काम पूर्ण होणार आहे. ज्यामध्ये खापरी, एअरपोर्ट, उज्वल नगर, जयप्रकाशनगर, छत्रपती चौक, राहटे कॉलनी चौक, काँग्रेस नगर व सिताबर्डी स्टेशनचा समावेश आहे. या भागातील ट्रकचे कामही सुरू आहेत. तर डबल डेकरचे काम हे डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. हिंगण येथील ट्रकचे कामही सुरू झाले आहे. काही भागातील स्टेशनचे काम करताना जमिनीची अडचण येत आहे. येणाºया काळात मेट्रोचे काम फारच आत्याधुनिक पद्धतीने केले जाणार आहे. ज्यामध्ये कॉटन मार्केटमध्ये बनणाºया ब्रीजचा समावेश आहे. या शंभर मिटरच्या ब्रिजचे बांधकाम हे पूर्णपणे हवेत होणार आहे. अशा ब्रिजचे निर्माण हे पुढे अनेक भागातही होणार आहे. याला आईकॉनिक ब्रिज असे संबोधले जात असून यासाठी आत्याधुकिन यंत्रांची मागणी करण्यात आली असल्याचेही दीक्षीत यांनी सांगितले.

वर्धा रोड होणार ब्लॉक
येणाऱ्या काही दिवसात वर्धा रोड येथील मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे येथील पूर्ण रस्ता हा ब्लॉक होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांसाठी खामला ते एअरपोर्ट असा मार्ग खुला करण्यात येणार आहे. या भागात पहिल्या टप्प्याचे काम सुरू असल्याने अशी अडचणी आली नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील काम फार महत्त्वाचे राहणार असल्याने हा रस्ता ब्लॉक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या